पाकिस्तानमध्ये सिंचनासाठीच्या पाण्याच्या प्रचंड तुटवडा

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील Indus River System Authority (IRSA)ने पाकिस्तानच्या प्रांतीय सरकारांना पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याविषयी बजावले आहे. देशात सिंचनासाठीच्या पाण्याचा तुटवडा जवळपास ४५ टक्क्यांनी वाढला आहे. IRSAने लिहिलेल्या एका संयुक्त पत्रात म्हटले आहे की, पाण्याचा वापर कुशलतापूर्वक, सावधगिरीने आणि विवेकपूर्ण पद्धतीने करावा. याबाबत Dawn वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, जूनमध्ये पाण्याच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणतेही नुकसान न करता पाण्याची सुसंगत मागणी करण्याबाबत (प्रांतना पाण्याच्या आवश्यकतेचा आदेश) प्रांतीय सिंचन सचिवांना सांगितले आहे.

याबाबतच्या पत्रात म्हटले आहे की, पाण्याच्या कमतरतेमुळे पंजाबला ६५,००० क्यूसेक पाणी देण्यात आले आहे. तर त्यांच्या एकूण वाट्याचे ११३,००० क्यूसेक पाणी आहै. सिंधला आपल्या हिश्याच्या ११६००० क्युसेक पाण्याच्या तुलनेत ६६,००० क्युसेक पाणी उपलब्ध करून देण्यात आल आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा यांना अनुक्रमे १३,००० क्यूसेक आणि ३,००० क्यूसेक ह आपल्या पूर्ण हिश्याचा पुरवठा केला जात आहे. IRSA च्या अधिकाऱ्यांनी सांगितेल की, झेलम आणि चिनाब या नद्यांचा प्रवाह यावर्षी अनुमानापेक्षा ४५ टक्क्यांनी कमी होता. त्यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. Dawnच्या रिपोर्टनुसार मंगलामध्ये झेलम नदीचा प्रवाह गेल्या वर्षीच्या ५५,००० क्सूसेक प्रवाहाच्या तुलनेत आता २७,००० क्युसेक होता. तर चिनाब नदीचा प्रवाह गेल्या वर्षीच्या ३८,००० क्युसेकच्या तुलनेत २४,००० क्युसेक होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन जल संसाधनांवर राष्ट्रीय संसदेच्या स्थायी समितीने पाणी वाटपाबाबत आलेल्या प्रांतांच्या तक्रारी दूर करण्यासाठी टुनसा, पुंजनाड, गुड्डू आणि सुक्कुर ही धरणे तसे नदीखोऱ्यांत पाहणी करून अहवाल मागितला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here