देशात साखर कमी पडणार नाही: इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन(ISMA) चे सरकारला आश्वासन

नवी दिल्ली: कोरोना वायरसचा सर्व उद्योगांवर परिणाम झाला आहे. तसेच आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पण देशात पुरेशी साखर आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जायचे कारण नाही. इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) ने आश्वासन दिले की, देशात आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेत कोणतीही समस्या येणार नाही.

इस्मा ने सांगितल्या नुसार कोरोनाचा प्रसार आणि लॉक डाउन मुळे सुरुवातीला ट्रक उपलब्ध नसल्याने साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, पण केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे, गेल्या 4-5 दिवसात स्थिती सुधारली आहे.

यावेळी देशभरात केवळ 186 साखर कारखान्यातच गाळप सुरु आहे. या हंगामात आतापर्यंत 232.74 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. तर गेल्या गाळप हंगामात या दरम्यान 296.82 लाख टन उत्पादन झाले होते.

इस्मा ने सांगितले की, कुठेही ऊस उपलब्ध असेल, तिथे शेतकऱ्यांना कसलीही बाधा येऊ नये यासाठी कारखाने प्रयत्न करत आहेत. आणि त्या क्षेत्रातील साखर कारखाने सुरु आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here