ISMAकडून उसाचा रस, सिरपपासून उत्पादित इथेनॉलसाठी जादा दराची मागणी

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केंद्र सरकारकडे उसाचा रस अथवा शुगर सिरपपासून ( sugar syrup) उत्पादित इथेनॉलच्या दर सुधारणेबाबत पुन्हा एकदा विचार करण्याचा आग्रह केला आहे. २०२२-२३ साठी सी हेवी मोलॅसीस आणि बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलसाठी एक डिसेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारीत दराचे स्वागत करताना ISMAने सांगितले की, उसाचा रस, शुगर सिरपपासून निर्मिती इथेनॉलचा सध्याचा दर पुरेसा नाही.

ISMA चे महासंचालक Sonjoy Mohanty यांनी सांगितले की, उद्योग २०२२-२३च्या पुढील हंगामासाठी इथेनॉलच्या किमतीमधील बदलांचे स्वागत करण्यात येत आहे. एक डिसेंबर २०२२ पासून हा हंगाम सुरू होईल. सी हेवी मोलॅसिस आणि बी हॅवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलसाठी जाहीर झालेल्या सुधारित किमती साखर कारखान्यांना इथेनॉलच्या उत्पादनाकडे अधिक साखर वळविण्यास फायदेशीर ठरतील. मात्र, उसाच्या रसापासून, शुगर सिरपपासून उत्पादित इथेनॉलच्या किमतीमधील सुधारणा नव्या क्षमता निर्माणासाठी, अतिरिक्त गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशी नाही.
ते म्हणाले की, उद्योगाने सरकारकडे अनेकवेळा याबाबत मागणी केली आहे की, साखरेचा रस, सीरपपासून उत्पादीत इथेनॉलची किंमत ५ वर्षांच्या पेबॅक कालावधीसह इक्विटी रिटर्नवर आधारित हवी. ROEवर आधारित किंमत ६९.८५ रुपये प्रती लिटर आहे. सरकारकडून जाहीर झालेली किंमत ६५.६१ रुपये प्रती लिटर आहे.

केंद्र सरकार २०२२-२३ या इथेनॉल हंगामात १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणार आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एकूण ६५१ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. आणि साखर कारखान्यांकडून जवळपास ४५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली जाण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, ऊसाचा रस, शुगर सिरप यापासून मिळणाऱ्या इथेनॉलसाठी जर सरकारने जादा दर दिला तर उद्योगाला १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here