१०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करण्याची ISMA ची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रणात कालबद्ध पद्धतीने वाढ करण्याऐवजी त्वरीत १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती करण्यास त्वरीत परवानगी देण्यात यावी अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) केंद्र सरकारकडे केली आहे. स्वर्च ऊर्जेची लवकरात लवकर निर्मिती झाल्यास प्रदूषण कमी होईल आणि कच्च्या तेलावरील अवलंबीत्व कमी होईल असे इस्माचे म्हणणे आहे.

दि हिन्दू बिजनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ब्राझील मॉडेलचा हवाला देऊन ISMAचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी म्हटले आहे की, E20 वाहनांचे लाँचिंग करण्याऐवजी फ्लेक्स-फ्यूल वाहने (FFVs) हाइब्रिड त्वरीत लाँच करण्याची गरज आहे. कारण, FFVs 20 टक्क्यांपेक्षा अधिक मिश्रणावर चालू शकतात. सरकारला लिहिलेल्या पत्रात झुनझुनवाला यांनी म्हटले आहे की, E20-चे पालन करणाऱ्या वाहनांच्या निर्मितीनंतर लाँचिंगपासून देशात सर्वत्र त्याचा वापर करण्यास ८-१० वर्षे लागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here