साखरेची किमान विक्री किंमत प्रती किलो ३६-३७ रुपयांपर्यंत वाढविण्याची इस्माची मागणी

54

नवी दिल्ली : उद्योगातील प्रमुख संस्था इस्माने अन्न मंत्रालयाकडे साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) सध्याच्या ३१ रुपये प्रती किलोवरुन वाढवून ३६-३७ रुपये प्रती किलो करण्याची मागणी केली आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा हवाला देत इस्माने ही मागणी केली आहे. इंडियन शुगर मील असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी अन्न विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या योग्य आणि लाभदायी दराची (एफआरपी) पूर्तता करण्यासाठी साखरेची एमएसपी हा महत्त्वाचा घटक आहे.

याबाबत दि प्रिंटच्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, सद्यस्थितीत साखरेची देशातील एक्स मिल किंमत ३३-३४ रुपये प्रती किलो आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील एक्स मिल किमती जवळपास ३२-२२ रुपये प्रती किलोपेक्षा कमी आहेत, असे इस्माकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झुनझुनवाला म्हणाले की, सद्यस्थितीत एक्स मिल किमती एफआरपीपेक्षा जवळपास ३६-३७ रुपये प्रती किलोच्या उत्पादन खर्चापेक्षा खूप कमी आहेत. त्यामुळे उसाच्या एफआरपीसोबत साखरेची एमएसपी जोडून साखरेची एमएसपी जवळपास ३६-३७ रुपये प्रती किलोपर्यंत वाढवली जावू शकते.

इस्माने सांगितले की, जवळपास ८५ टक्के महसूल साखरेच्या विक्रीतून येतो. त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी सक्षम होणे महत्त्वपूर्ण आहे. असोसिएशनने सांगितले की, केंद्र सरकार जून २०१८ पासून साखरेची एमएसपी ठरवत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यात सुधारणा करून ३१ रुपये प्रती किलो करण्यात आली. त्यावेळी उसाची एफआरपी २७५ रुपये होते. त्यानंतर आतापर्यंत उसाच्या एफआरपीत दोनवेळा एकूण १५ रुपये प्रती किलो वाढ केली गेली. मात्र, एमएसपी वाढली नाही. २०२१-२२ या वर्षात एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here