ISMAच्या अंदाजानुसार साखर उत्पादन 26.5 मिलियन टन होण्याची शक्यता

75

नवी दिल्ली: इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) ने या वर्षी साखर उत्पादनाच्या पूर्व अंदाजानुसार सांगितले की, देशात यावेळी साखरेचे उत्पादन 26.5 मिलियन टन होण्याची आशा आहे. इस्मा ने नोव्हेंबर मध्ये 26 मिलियन टन साखर उत्पादन होण्याची आशा वर्तवली होती.

गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादक राज्यात ऊस उत्पादन कमी झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांबाबत बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशातील कारखान्यातील चालू हंगाम (2019-20) दरम्यान 118 लाख टन साखर उत्पादनाची आशा आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 62 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे. कर्नाटक या तिसऱ्या प्रमुख साखर उत्पादक राज्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जवळपास 33 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. इस्मा नुसार देशाच्या इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. तमिलनाडु, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़, ओडिशा आणि उत्तराखंड मध्ये सामूहिक रुपात जवळपास 52 लाख टन साखर उत्पादन होण्याची आशा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here