इस्माकडून २०२१-२२ या हंगामासाठीचे साखर उत्पादन अनुमान जारी

98

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जून २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात करण्यात आलेल्या सॅटेलाईट मॅपिंगच्या पहिल्या सर्वेक्षणाच्या आधारावर २०२१-२२ या हंगामासाठी ३१० लाख टन साखर उत्पादनाचे प्रारंभिक अनुमान जारी केले होते. हे अनुमान इथेनॉल उत्पादनासाठी ३४ लाख टन साखर संभाव्य डायव्हर्जन लक्षात ठेवून हे अनुमान जारी करण्यात आले होते. आपल्या नव्या अनुमानात इस्माने २०२१-२२ या हंगामात ३०५ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

इस्माने सांगितले की, देशभरात ऊसाच्या पिकाच्या लागवडीची उपग्रहाद्वारे दुसरी छायाचित्रे ऑक्टोबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात आली आहेत. उपग्रहांच्या छायाचित्रांच्या आधारावर २०२१-२२ या हंगामात ऊसाच्या एकूण लागवड क्षेत्र ५४.३७ लाख हेक्टर असण्याची शक्यता आहे. २०२०-२१ या हंगामातील ५२.८८ लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या तुलनेत ते ३ टक्क्यांनी अधिक आहे. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी इस्माच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उसाची घेतलेली उपग्रह छायाचित्रे, अपेक्षित उत्पादन, संबंधीत विविध पैलूंवर आधारित अहवालावर चर्चा करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील ऊसाचे क्षेत्रफळ २३.०८ लाख हेक्टर असेल असा अंदाज आहे. इस्माने उत्तर प्रदेशातील पूर्व क्षेत्रात जोरदार आणि बिगरमौसमी पावसामुळे उत्पादनात किरकोळ घसरणीची शक्तता वर्तविली आहे. उत्पादीत साखर उत्पादन, २०२१-२२ मध्ये इथेनॉल उत्पादनावर आधारित ११३.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र २०२०-२१ च्या ११.४८ लाख हेक्टर टनावरुन वाढून २०२१-२२ मध्ये १२.७८ लाख हेक्टर झाले आहे. राज्यात मान्सूनही चांगला राहिला. परिणामी राज्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. इथेनॉल डायव्हर्जनचा विचार केला नाही तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १२२.५ लाख टन होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात गेल्या हंगामातील ऊस क्षेत्र ५.०१ लाख हेक्टरच्या तुलनेत २०२१-२२ या हंगामात ५.११ लाख हेक्टर आहे. २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन ४९.५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. उर्वरीत राज्यांत २०२१-२२ या हंगामात सामूहिक रुपाने ५३.१० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

साखरेचा रस, सिरप आणि बी मोलॅसीसच्या महत्त्वपूर्ण उत्पादनाला इथेनॉल उत्पादनात बदलण्यात आले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात जवळपास ३४ लाख टनाची घट होईल. त्यामुळे उसाचा रस, बी शिरा याला इथेनॉलमध्ये रुपांतरीत होत असल्याने इस्माने २०२१-२२ मध्ये ३०५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. सुरुवातीच्या ३१० लाख टन साखर उत्पादनाच्या अनुमानापेक्षा हे उत्पादन कमी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here