हंगाम २०२१-२२ मधील वचनबद्धतेसाठी अतिरिक्त १० LMT साखर निर्यात रिलिज ऑर्डरचा ISMAचा आग्रह

गेल्या पाच वर्षात भारतीय साखरेची निर्यात ०.४७ LMT ने वाढून १०० LMT झाली आहे. ही वाढ २०० पट अधिक आहे. साखरेची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी सरकारने चालू साखर हंगामात २०२१-२२ मध्ये साखर निर्यात १०० LMTवर मर्यादीत केली आहे. आता साखर निर्यात मर्यादा वाढविण्याची मागणी उद्योगाकडून होत आहे.

उद्योगाची प्रमुख संस्था इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) चालू हंगामात २०२१-२२ साठीची साखर निर्यात आश्वासने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १० LMT Export Release Order (ERO) देण्यासाठी आग्रह केला आहे.
ISMA चे अध्यक्ष Aditya Jhunjhunwala यांनी सांगितले की, “आम्ही मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमीळनाडूमधील उसाच्या जादा उपलब्धतेमुळे ३५० लाख टन साखर उत्पादनाचे अनुमान ३६० लाख टनावर आणले आहे. कारण साखरेचे उत्पादन आता ३६० लाख टन होण्याची अपेक्षा आहे, आणि आम्ही साखरेचा खप २७५ लाख टन असेल अशी अपेक्षा करतो. त्यामुळे जवळपास ६७ लाख टनाचा क्लोजिंग बॅलन्स असेल. साखरेचे अंदाजे उत्पादनातील वाढ पाहता आम्ही सरकारला चालू हंगामात साखर उद्योगाला आणखी १० LMT साखर निर्यातीची परवानगी देण्याची विनंती करीत आहोत. साखरेचा हा खप २.५ महिन्यांसाठी पुरेसा ओपनिंग बॅलन्स राखून ठेवेल असे आम्हाला वाटते.
ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांच्या ६ जून २०२२ रोजीच्या Export Release Order (ERO) मध्ये जवळपास १७ लाख टन निर्यातीसाठीच्या अर्जांपैकी, साखर कारखान्यांना केवळ ८ लाख टन रिलिज ऑर्डर जारी करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की आतापर्यंत जमा केलेल्या निर्यात अर्जांमध्ये ९ लाख टनाची कमतरता आहे. सरकारने व्यापाकी, निर्यातदारांऐवजी साखर कारखान्यांना अतिरिक्त १० LMT निर्यातीचे आदेश द्यावेत, अशी उद्योगाची मागणी आहे. तरच साखर कारखान्यांना आपल्या निर्यातीच्या आश्वासनांची पुर्तता करता येईल. आणि आगामी हंगामावर याचा परिणाम होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here