भारतात पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या साखर हंगामात जागतिक पातळीवर वाढलेल्या साखर दराचा फायदा घेत ६० लाख टन साखर निर्यात होण्याचा अंदाज आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. देशात २०२०-२१ या कालावधीतील पहिल्या ११ महिन्यात ६६.७ लाख टन साखर निर्यात केली आहे. गेल्या हंगामात झालेल्या ५५.७ लाख टन साखर निर्यातीपेक्षा ती कितीतरी पट अधिक आहे. यंदा चालू हंगामात एकूण ७० लाख टनावर निर्यात होऊ शकते.
भारतीय साखर कारखाना संघाने (ईस्मा) सांगितले की ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनातील घसरण गृहीत धरून जागतिक बाजारपेठेत साखर तुटवड्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या साखरेचा दर चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर, २० सेंट प्रती पाउंड मिळत आहे. त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांना आणखी काही महिने, जानेवारी २००२२ पर्यंत आणि त्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत ब्राझीलची साखर बाजारात येण्यापूर्वी आपली अतिरिक्त साखर निर्यात करण्याची चांगली संधी असेल. अनेक कारखान्यांनी साखर निर्यातीचे करार केले आहेत. आगामी सत्रात भारतीय कारखाने ६० लाख टनांपर्यंत साखर निर्यात करू शकतात असा आशावाद ईस्माने व्यक्त केला.
याशिवाय थायलंडमध्ये पुढील हंगामात साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे मात्र हे उत्पादन १.४-१.५ कोटी टनापेक्षा ३० ते ३५ लाख टन कमी असेल. भारताकडून सध्याच्या काळात सुरू असलेली निर्यात ६६.७ टन झाली आहे. आगामी वीस दिवसांत एकूण निर्यात ७० लाख टनावर पोहोचू शकते. यामध्ये कच्ची साखर ३४.२ लाख टन, पांढरी साखर २५.६ लाख टन आणि प्रक्रिया केलेली साखर १,८८,००० टन आहे असे ईस्माने सांगितले. आतापर्यंत ६६.८ लाख टन निर्यात झाली असून २,२९,००० टन साखर बंदरात पोहोचली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link