कलबुर्गी जिल्ह्यात राबवणार इस्त्राईलच्या शेतीचे मॉडेल

122

कलबुर्गी : कर्नाटकातील खाण आणि भूविज्ञान मंत्री मुरुगेश निरानी यांनी सांगितले की, कलबुर्गी जिल्ह्यातील विविध आर्थिक क्षेत्रातील पिछाडीवर असलेल्या गटांच्या उत्थानासाठी गेल्या तीन दशकांचे महत्त्वाकांक्षी कलबुर्गी व्हीजन २०५० लागू केले जाईल. या अंतर्गत येथील शेतीमध्ये इस्त्राईलच्या शेतीचे मॉडेल राबवले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे मॉडेल लागू असेल अशी माहिती मंत्री निरानी यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना निरानी म्हणाले, इस्त्राईलचे मॉडेल म्हणजे मर्यादीत संसाधने, पायाभूत सुविधांसोबत उच्च उत्पादकता असे आहे. आम्ही कलबुर्गी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पायलट प्रोजेक्ट राबवू. प्रत्येक तालुक्यात अशी १०० एकर शेती विकसित केली जाईल. या पायलट प्रोजेक्टचे निष्कर्ष तपासून त्याचा विस्तार इतर क्षेत्रात केला जाईल.
कलबुर्गीतील शेतकरी पारंपरिक पद्धतीने लाल चणा, ज्वारी, डाळ आदींचे उत्पादन घेतात. मात्र नकदी पिकांच्या तुलनेत हे कमी लाभदायक आहेत. गेल्या वीस वर्षांपासून शेजारील विजयपुरा जिल्ह्यातील शेतकरी अलमट्टी जलाशयाच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर करून नकदी पिकांचे, विशेषतः उसाचे उत्पादन घेतात. निरानी म्हणाले, कलबुर्गी दिल्यातील निवडक शेतकऱ्यांना विजयपुराचा दौरा करण्यास प्रोत्साहित केले जाईल. त्या भेटीत ते प्रत्यक्ष माहिती घेतील. यशस्वी शेतकऱ्यांकडून अनुभव मिळवतील आणि आपले ज्ञान कलबुर्गीमध्ये शेतीत वापरतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here