इस्रोने रचला नवा इतिहास, आता आदित्य L१ चा सूर्याकडे १२५ दिवसांचा प्रवास सुरू

इस्रोने आपले पहिले सूर्य मिशन PSLV-C57/Aditya-L1 चे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:५० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पीएसएलवी-एक्सएल रॉकेटने करण्यात आले आहे. या रॉकेटचे हे २५ वे उड्डाण होते.

हे पीएसएलव्ही रॉकेटचे ५९ वे उड्डाण आहे. तर पीएसएलव्ही एक्सएल व्हेरियंटचे २५ वे उड्डाण आहे. हे रॉकेट १४५.६२ फूट उंच आहे. लाँचवेळी याचे वजन ३२१ टन आहे. हे चार स्टेज रॉकेट आहे. त्याचे सहा ट्रॅप ऑन असतात. पीएसएलव्ही एक्सएल रॉकेट आदित्य एल १ ला पृथ्वीच्या खालच्या कक्षात सोडेल. आदित्य एल १ चे वजन १४८०.७ किलोग्रॅम आहे. लाँचनंतर जवळपास ६३ मिनिटानंतर आदित्य एल १ स्पेसक्राफ्ट रॉकेटपासून वेगळे होईल. रॉकेट फक्त २५ मिनिटात आदित्यला आपल्या कक्षेत पोहोचवेल.

या रॉकेटच्या सर्वात लांब उड्डाणांपैकी ही एक आहे. यापूर्वी असा लांबचा प्रवास २०२१ मध्ये ब्राझीलच्या अमेझोनियासह १८ उपग्रहांचे उड्डाण करण्यात आले होते. यासाठी एक तास ५५ मिनिटे लागली होती. त्याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये या रॉकेटने २ तास १५ मिनिटे उड्डाण केले होते. त्यानंतर आठ उपग्रह अवकाशात सोडले होते. लॅरेंज पाँईंट हे नाव गणिततज्ज्ञ जोसेफ लुई लँरेंज यांच्या नावावर देण्यात आले आहे. त्यांनी लॅरेज पॉईंटचा शोध लावला. दोन फिरणाऱ्या अंतराळातील वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटीचा एखादा पॉईंट असा येतो की जेथे गुरुत्वाकर्षणापासून सॅटेलाइट बचावू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here