इथेनॉलबाबत जनजागृती करवण्याची आपली जबाबदारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : सीओपी २७ मध्ये, भारताने २०७० पर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जन मिळविण्यासाठी हळूहळू स्वच्छ इंधनाकडे वळण्याचा आणि देशांतर्गत खप कमी करण्याचे धेय्य ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यासाठी इथेनॉलबाबत जनजागृती करणे आणि त्याविषयी शिक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे. भविष्यात सर्व पर्यायी इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी भारत गतीने स्थायी पर्यावरणशास्त्राचे तंत्र विकसित करीत आहे, असे मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

सोसाइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) सोमवारी इंडिया हॅबिटेटमध्ये ‘इथेनॉल अॅडॉप्शन-फ्लेक्स फ्युएल व्हेईकल्स इन इंडिया’ यावर एक औद्योगिक तंत्रज्ञान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

मंत्री गडकरी यांनी सांगितले की, इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे भारतात इंधनाच्या आयातीच्या खर्चात खूप फरक पडेल. आणि परकीय चलनाच्या साठ्यात बचत होईल आणि आत्मनिर्भर होण्यासाठी धोरणात्मक लाभ मिळेल. सद्यस्थितीत देशभरात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा स्तर १०.१७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आणि सर्व संबंधित घटक यास आणखी चांगले बनविण्यासाठी संघटतीपणे प्रयत्न करीत आहेत. कार्यक्रमात मोटार वाहन उद्योग तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, इंधन उद्योग आणि इतर हितधारक घटकांची भागिदारी दिसून आली. या प्रदर्शनात मारुती सुझुकी इंडिया, टीव्हीएस मोटर कंपनी, बजाज ऑटो लिमिटेड, हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल अँडड स्कूटर इंडिया, सुझुकी मोटरसायकल इंडिया, यामाहा मोटर इंडिया आणि रॉयल एनफिल्डने सहभाग नोंदवला आणि आपल्या फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here