महाराष्ट्रातील थंडीपासून आता लोकांना दिलासा मिळणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आज चांगले सुर्यप्रकाशित वातावरण राहील. चांगल्या उन्हामउळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळेल. मात्र, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचीही शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कमाल तापमान २८ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस राहील. याशिवाय दिवसभर स्वच्छ हवामान राहील.
मात्र, नागरिकांना १५ फेब्रुवारीनंतर थंडीपासून पूर्ण दिलासा मिळणार आहे. त्यानंतर ऊन वाढणार आहे. मुंबईत आज कमाल ३० तर किमान २१ तापमान राहील. पुण्यात कमाल ३३ आणि किमान १७ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. नागपूरमध्ये ३१ आणि १४ असे तापमान राहील. नाशिक, औरंगाबादमध्येही असेच वातावरण राहील असे भारतीय हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.