महाराष्ट्रात या ठिकाणी पडणार जोरदार थंडी, दोन दिवस शीत लहर

109

महाराष्ट्रीत थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत शीत लहर सुरू राहील अशी शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या क्षेत्रात पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढेल. दरम्यान दाट धुकेही पाहायला मिळेल. दुसरीकडे २८ जानेवारीनंतर हवामानात बदल होऊ शकेल. मुंबईत आता तापमान वाढू लागले आहे. लोकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे.

मुंबईत आज अधिक तापमान २९ तर किमान तापमान १४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. पुण्यात किमान तापमान २६ तर कमाल तापमान १२ अंश आहे. वातावरण ढगाळ राहील. नागपूरमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ९ डिग्री राहील अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये २४ डिग्री कमाल तर ६ डिग्री किमान तापमान राहील. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here