इटलीत साखरेचे दर घसरले; भारताला ठरविले जबाबदार

रोम (इटली) : चीनी मंडी

इटलीतील रोमच्या बाजारपेठेत झालेल्या साखरेच्या दरांच्या घसरणीला भारताला जबाबदार ठरविले जात आहे.

जागतिक बाजारपेठेत अन्न धान्याचे भाव डिसेंबरमध्ये चांगल्या प्रकारे स्थिर होते. पण, साखरेच्या दरांतील घसरण सुरूच होती, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) या संस्थेने दिली आहे.

एफएओचा साखरेच्या किंमतीचा निर्देशांक महिन्याभरात १.९ टक्क्यांनी घसरला आहे. भारतात वेगाने होत असलेल्या साखर उत्पादनाला यासाठी जबाबदार धरले जात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी उसाची मागणी घटली आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये साखरेच्या उत्पादनासाठी उसाचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. एकूणात २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये साखरेच्या किमतीचा निर्देशांक २२ टक्क्यांनी घसरला आहे.

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here