पंजाब: जगतजीत इंडस्ट्रिज लिमिटेड इथेनॉल प्लांट स्थापन करणार

65

कपूरथला : जगतजीत इंडस्ट्रिज लिमिटेडच्या (Jagatjit Industries Limited) संचालक मंडळाने आपल्या बैठकीत कपूरथला जिल्ह्यात हमीरा येथे २०० केएलपीडी धान्यावर आधारित इथेनॉल डिस्टिलरी प्लांट स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या योजनेसाठी बँकांकडून १८५ कोटी रुपये कर्ज आणि अंतर्गत स्त्रोतांकडून १५ कोटी रुपयांच्या माध्यमातून निधीची उभारणी केली जाईल. अलिकडेच जाहीर केलेल्या इथेनॉलच्या उच्च किमती आणि इथेनॉल मिश्रणाचा नवा टप्पा गाठण्यासाठी पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे प्रोत्साहीत झालेल्या कंपनीने पंजाबमध्ये आपल्या हमीरा युनिटमध्ये २०० केएलपीडी धान्यावर आधारित डिस्टिलरी प्लांट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here