Jagatjit Industriesची पंजाबमध्ये धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना

चंदीगढ/ कपूरथला : जगतजीत इंडस्ट्रिजच्या (Jagatjit Industries) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की , जगतजीत इंडस्ट्रिज लिमिटेड पंजाबमध्ये धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी २१० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

जगतजीत इंडस्ट्रिजचे मुख्य पुनर्गठन अधिकारी आणि प्रमोटर रोशनी सनाह जायसवाल यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात हमीरामध्ये २०० किलो लिटर प्रती दिन (२०० KLPD) क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करीत आहे. या योजनेसाठी एकूण खर्च २१० कोटी रुपये आहे. त्यांनी सांगितले की, गुंतवणुकीसाठी बँक कर्ज आणि आंतरिक स्त्रोतापासून निधी जमवला जाईल. कंपनीला या प्रकल्पासाठी आधीच पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. आणि प्लांटसाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून लायसन्स मिळाले आहे. हा प्लांट जून २०२४ पासून सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

जायसवाल यांनी सांगितले की, आम्ही इंधन वितरण कंपन्यांना (ओएमसी) इथेनॉल पुरवठा करू. आम्ही इथेनॉल प्लांटच्या महसुलातून जवळपास ४०० कोटी रुपयांच्या वाढीची अपेक्षा करीत आहोत. त्यांनी सांगितले की, यावर्षी आम्ही एक रिअल इस्टेट संपत्ती विकून आमचे कर्ज ५० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here