सरकारच्या खांडसरी धोरणाला गूळ खांडसरी उत्पादक संघटनेचा विरोध

बिजनोर : किरतपूरमध्ये गूळ खांडसरी उत्पादक संघाच्या सदस्यांनी सरकारच्या खांडसरी धोरणाविरोधात आगामी हंगामात ऊस क्रशर युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गूळ खांडसरी उत्पादक संघाचे कार्यकर्ते हाफिज अब्दुल्ला यांच्या क्रशरवर मोहम्मद कासिम मकरानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण अग्रवाल यांनी सांगितले की, सरकारने क्रशर सुरू करण्यापूर्वी १५ दिवस आधी प्रदूषण विभाग तसेच अबकारी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र जमा करण्यासह मंडई समितीचा कर लागू केला आहे. हे व्यावसायिकांच्या हिताचे नाही. त्यास संघाचा विरोध आहे. २०२२-२३ या हंगामात गूळ खांडसरी बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गूळ खांडसरी उद्योग हा बिजनोर जिल्ह्याचा मुख्य उद्योग आहे. ऊस क्रशर बंद राहिल्यास येथील अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. प्रत्येक क्रशरवर ६० ते ८० मजूर काम करतात. त्यांच्या रोजी-रोटीवर परिणाम होईल. क्रशरवर ऊस बिले रोख मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळतो. क्रशर युनिट बंद झाल्यास शेतकऱ्यांसमोर ऊस कुठे पाठवायचा, यासह रोख पैशांचीही समस्या येईल. या बैठकीस वीरेश अग्रवाल, आशेंद्र सिंगल, सत्येंद्र अग्रवाल, साईम राजा, शमसुद्दीन मकरानी, कुशलपाल, नरदेव सिंह, नवनीत अग्रवाल, अवनीश अग्रवाल एवं भूपेंद्र आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here