जळगाव : दुष्काळी वणव्यामुळे जेमतेम ऊस लागवड, उत्पादन घटले

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. दुष्काळी वणव्यामुळे यंदा जेमतेम ऊस लागवड झाली आहे. पुढील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तालुक्यातून फारसा ऊस उपलब्ध होणार नाही, असे चित्र आहे. ग्रामीण भागात अनेक गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली येत असून ऊस लागवडीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत ५०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत हे क्षेत्र वाढणार आहे. साधारणतः अजून २०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. गेल्यावर्षी १६८२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. गेल्यावर्षाच्या तुलनेत लागवड क्षेत्र ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. दोन दशकांपूर्वी हे क्षेत्र ८ ते १० हजार हेक्टरपेक्षा जात होते.

ऊस लागवडीला साखर कारखाने बंद असल्याचा फटका बसत आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गचक्रात बदल झाल्याने दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर संकटांमुळे शेती व्यवसायासमोर आव्हाने उभी केली आहे. मन्याडच्या पट्ट्यात २२ गावांमध्ये ऊस हे मुख्य पीक होते. आता परिस्थिती बदलली आहे. ऊस दर, तोडणी, साखर कारखान्यांपर्यंत ऊसाची वाहतूक, बिल मिळण्यास होणारा विलंब यामुळेही शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळेही उसाची शेती फारशी परवडत नाही अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here