जालना : ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला शेतकऱ्यांची पसंती

जालना : गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा मजुरांचा तुटवडा भासल्याने हार्वेस्टरची संख्या वाढली आहे. अनेक साखर कारखान्यांनी उसाची तोडणी करण्यासाठी हार्वेस्टरचा वापर सुरू केल्याचे दिसून आले. अंबड तालुक्यातील मठपिंपळगावसह परिसरात हार्वेस्टरचा वापर वाढला आहे. शेतकरी तसेच साखर कारखान्यांच्या वेळ व पैशांची बचत होत असल्याने हार्वेस्टर फायदेशीर ठरत आहे.

हार्वेस्टर यंत्र वेगाने उसाची तोडणी करते. उसाचे तुकडे तयार करून तोडणीवेळी यंत्रासोबत चालणाऱ्या ट्रॉलीत टाकले जाते. ट्रॉली भरल्यानंतर ट्रकमध्ये उसाचे तोडलेले टिपरे ओतले जातात. हे सर्व काम ऑटोमॅटिक चालते. या कामासाठी फक्त चार ते पाच माणसांची गरज असते. यंत्रामुळे ऊसतोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही.

ऊसतोड कामगारांना तोडणीसाठी बोलावताना शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो. यामुळे वेळप्रसंगी अधिकचे पैसेदेखील खर्च होतात. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. मजुरांमुळे ऊसतोडणी करण्यासाठी तब्बल एक महिना लागतो. मात्र, यंत्राद्वारे ऊसतोडणी अवघ्या चार दिवसांत पूर्ण होते. याबाबत शेतकरी बाबासाहेब जिगे म्हणाले की, मोठ्या क्षेत्रासाठी हार्वेस्टरने ऊसतोडणी फायद्याची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here