जमैका कंपनी घाट्यात ; साखर कारखाना विकण्याची घोषणा

जमैका फूड कंपनी सध्या घाट्यात असून सेंट थॉमस च्या डैकनफिल्ड येथे असणारा कंपनीचा साखर कारखाना विकणार असल्याचे जमैका फूड कंपनी सेप्रोड लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड पंडोहाई यांनी सांगितले. कंपनीच्या अर्थिक उलाढालीत घसरण झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. साखर कारखाना विकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तसेच हा कारखाना खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोधण्यासाठी सेप्रोड यांनी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (PWC) यांना पाचारण केले आहे. पण कारखान्याची विक्रीची किंमत अजूनही जाहीर झालेली नाही.

पंडोहाई म्हणाले, आंम्ही PWC ला कारखान्यासाठी ग्राहक शोधायला सांगितला आहे. शेतीमधे इतर अनेक गोष्टींबरोबर ऊसालाही ठेवले जाते, त्यामुळे कदाचित ऊस खराब होण्याची शक्यता आहे. म्हणूनच जो कुणी कारखाना खरेदी करेल, त्यांनी कारखाना चालू ठेवावा म्हणजे ऊस पिकासाठी ते योग्य ठरेल.

पहिल्या तिमाहीत साखर उत्पादनात सेप्रोडला $150 मिलियनचे नुकसान झाले होते. यामुळे कंपनी घााट्यात गेली. यानंतर मात्र कंपनीने दुसऱ्या उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here