जमैकातील साखर कारखाना अडचणीच्या उंबरठ्यावर

किंग्जटन (जमैका) : चीनी मंडी

शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे पाठ फिरवल्याने जमैकामधील फ्रोम शुगर फॅक्टरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. जमैकाचे कृषी मंत्री जे. सी. ह्युटचिनसन यांनी हे मत व्यक्त केले असून, हे सरकारचे किंवा कृषी मंत्रालयाचे मत नाही. तर आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

जे. सी. ह्युटचिनसन म्हणाले, ‘मला असे म्हणायचे नाही. पण, मला भविष्यातील स्थिती डोळ्यासमोर दिसत आहे. फ्रोम कारखान्याकडे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ आहे, असे मला वाटत नाही.’ एका सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलत होते. कारखाना परिसरातील निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन करणे बंद केले असून, जनावरे पाळण्याकडे आणि इतर नगदी पिकांकडे त्यांचा कल आहे.

या संदर्भात जमैका ऑब्झर्वरने ह्युटचिनसन यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, ‘मला शंका आहे की येत्या काही काळात फ्रोम कारखाना चालवण्यासाठी त्यांना पुरेसा ऊस मिळणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी सध्या बटाटा, गाजर, रताळी या नगदी पिकांकडे वळतत आहेत.या परिस्थितीत आपण काय करायचे, हे साखर कारखाना व्यवस्थापनाला कळत नाहीय. पण, शेतकरी जर, उसापासून दूर जाऊ लागले तर, माझ्यासाठी ती निश्चितच चिंतेची बाब असणार आहे. कारखान्याला पुरवण्यासाठी ऊसच नसेल, तर तुम्ही अडचणीत असाल.’ फ्रोम ही कंपनी २०११मध्ये चीनच्या पॅन कॅरेबिनय या कंपनीने चालवायला घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत जमैकामधील साखर उत्पादनातमध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. देशात १९६५मद्ये ५ लाख १४ हजार ८२५ टन साखर उत्पादन होत होती. ते उत्पादन आता केवळ ८३ हजार टनांपर्यंत घसरले आहे. देशातील साखर उद्योगावर अजूनही ३५ हजार जणांचा रोजगार अवलंबून आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here