ऊस उत्पादकांच्या समस्यांबाबत जदयूचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोपालगंज : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी जनता दल युनायटेडचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी आमदार मंजित कुमार सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार ज्या योजना राबवत आहेत, त्यांचा लाभ पोहोचवावा अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंजित कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री ऊस विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन अर्ज व्यवस्था करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या एकाच नकदी पिकाचा आधार आहे. मात्र, २०२० मध्ये आलेल्या भिषण पुरामुळे ऊस पिक नष्ट झाले. त्याची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ऊस उद्योग विभागाने ३३ टक्के नुकसानीचा अहवाल देवूनही कार्यवाही झालेली नाही. ती करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन महेश राय, जदयूचे जिल्हाध्यक्ष आदित्य शंकर, अभय पांडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here