झारखंड: पाच एकरातील आगीत ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान

डोमचांच : विभागातील कुंडीधनवार पंचायतीच्या चौथ्या वॉर्डमधील महथा टोला येथे पाच एकर शेतामध्ये लागलेल्या आगीत ऊस पिक जळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे जवळपास ६० शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ज घेवून पिकाचे उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांसमोर त्याच्या परतफेडीची समस्या निर्माण झाली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केशो नदी किनाऱ्यावर महथा टोला गाव आहे. या परिसरात जवळपास ६० ते ७० शेतकरी ऊस शेती करतात. पाच एकरातील ऊस तयार झाला होता. आगामी आठवड्यामध्ये या ऊसाची तोडणी करण्यात येणार होती. मात्र, रविवारी सायंकाळी अचानक या उसाला आग लागली. आणि सर्व ऊस जळून खाक झाला. गावात यामुळे खळबळ उडाली. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आग पसरली होती आणि ऊस जळाला. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here