इथेनॉल उत्पादनात झारखंडला बनायचेय अव्वल राज्य

नवी दिल्ली : झारखंड सरकारने नवी दिल्लीत येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय गुंतवणूक परिषदेत अनेक कंपन्यांनी झारखंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. न्यू समृद्धी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या विनय त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांची कंपनी राज्यात इथेनॉल उत्पादनासाठी गॅस अॅथॉरीटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (गेल) संयुक्त विद्यमाने ६०० कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहे. त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत झालेल्या प्रश्नोत्तरावेळी आपली इच्छा व्यक्त केली.

यांदरम्यान, राज्य सरकारकडून त्रिपाठी यांनी ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. गेलसोबत संयुक्त उद्योगासाठी याची आवश्यकता आहे. यासाठी उद्योगातील गुंतवणूकदारांसोबत तत्काळ बैठक घेतली जाईल असे उद्योग सचिव पूजा सिंघल यांनी सांगितले.

डेली पायोनिअरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार व्हायब्रेंट स्पिरीट प्रायव्हेट लिमिटेडचे सिद्धार्थ कनोडिया यांनी रांचीत इथेनॉल प्लांट सुरू करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. कनोदिया यांनी सांगितले की, प्लांट सुरू करण्यासाठी जमिनीची गरज आहे. उद्योग सचिव पूजा सिंघल यांनी सांगितले की, रांचीमध्ये औद्योगिक पार्क साकारत आहेत. त्यामध्ये इथेनॉल प्लांटसाठी तरतूद केली जाईल. यामध्ये ५० टक्के सवलत दिली जाईल. इथेनॉल प्लांटसाठी दहा कोटी रुपयांपर्यंत अनुदान असल्याचे त्या म्हणाल्या. शिवनारायण जायस्वाल प्रायव्हेट लिमिटेडने रांचीमध्ये ३६ केएलपीडीचा इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग डिस्टीलरी सुरू करण्याचा प्रस्ताव दिली आहे.

दिल्लीत दोन दिवसीय परिषदेत गुंतवणूकदारांशी बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन म्हणाले की, राज्याला इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि इथेनॉल उत्पादनात अव्वल बनण्याची अपेक्षा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here