पॅरिस : फ्रान्समधील सर्वात मोठा साखर आणि इथेनॉल उत्पादक समूह टेरियॉसने बीट उत्पादनात घसरण अपेक्षित असल्याचा आरोप करत उत्तर फ्रान्समधील एक कारखान्याचे कामकाज बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टेरियॉसच्याया निर्णयाने अनेक लोकांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे टेरियॉसच्या या निर्णयावर फ्रान्स सरकारने कठोर टीका केली आहे. कृषी मंत्री मार्क फेस्नो यांनी गेल्या आठवड्यात टेरियॉसला आपल्या या निर्णयामागील आर्थिक व्यवस्थापनाची माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
साखरेच्या वाढत्या किमती, ब्राझीलमधील मोठ्या घडामोडींमुळे जगातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या टेरियॉसला गेल्या वर्षी जबरदस्त नफा मिळाला आहे. मात्र, विक्रमी कर्जामुळे समुहाने जगभरातील संपत्ती विक्रीस काढली आहे. टेरियॉस समुहाने सांगितले की, गेल्या आठवड्यात त्यांनी एक डिस्टिलरी बंद करण्याची योजनाही तयार केली होती. सूत्रांनी सांगितले की, कामगारांनी एस्कोडोवेरेस कारखाना बंद केला आहे. यामध्ये ४०,००० टन साखर आणि आगामी पिक हंगामासाठी बियाणे आहे. साखरेच्या वाढत्या किमती असूनही आगामी आठवड्यात फ्रान्समधील बीटचे लागवड क्षेत्रामध्ये १४ वर्षातील निच्चांकी स्तरापर्यंत घसरेल अशी शक्यता आहे.