बांग्लादेश: जोयपुरहाट साखर कारखान्यावर प्रदूषण पसरवण्याचा आरोप

100

जोयपूराहाट : बांग्लादेशातील जोयपूरहाट साखर कारखान्यातील औद्योगिक प्रदूषणामुळे जिल्ह्यातील तुलसी गंगा नदीच्या पाच किमलोमीटर पर्यंत पसरलेले पाणी प्रदूषित झाले असल्याचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून पाणी खराब झाले आहे. साखर कारखान्याने हे पाणी प्रदूषित केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत विचारणा केल्यावर, जौयपूरहाट साखर कारखाना प्रबंध निदेशक अन्वर हुसैन यांनी हा आरोप नाकारला. त्यांनी सांगितले की, आम्ही पहिल्यांदा कचर्‍याला कारखान्याच्या आत असणार्‍या तलावात फेकतो. त्यानंतर पाणी एका पाईपमधून तुलसी गंगा नदीपर्यंत जाते. कारखान्यात कोणतेही ईटीपी नाही. अन्वर हुसैन यांनी सांगितले की, संबंधित मंत्रालयाने कारखान्यात ईटीप च्या स्थापनेच्या प्रक्रियेसाठी अंतिम मंजूरी दिली आहे.

नदी काठी राहणार्‍या रहिवाशांनी आरोप केला की, साखर कारखान्याने नदीच्या पाण्याला प्रदूषित केले आहे. ते म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपासून नदीच्या पाण्याचा आम्हाला उपयोग होत नाही. पाण्यात दुर्गंध आहे आणि नदीमधले मासे मरत आहेत. अकेलपूर उपजिल्हा कृषी अधिकारी शाहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नदीच्या पाण्याचा चांगला उपयोग व्हायचा. नदीकाठचे शेतकरी सिंचनासाठी नदीच्या पाण्यावर निर्भर आहेत. शाहिदुल इस्लाम म्हणाले की, शेतकर्‍यांनी या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करु नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. अकेलपूर उपजिल्हा मत्स्य अधकारी मोहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, तुलसी गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा खराब आहे. फक्त मासेच नाहीतर यामध्ये कोणताही प्राणी जिवित राहू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here