जून महिन्यात २१ लाख टन साखर विक्री होणार : देशांतर्गत बाजारातील चित्र

कोल्हापूर, दि. 12: केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी पॅकेज जाहीर करत असतानाच कोणत्या साखर कारखान्याने किती साखर विक्री करावी. याच कोटा ठरवून दिला आहे. त्यानूसार सध्या देशांतर्गत बाजारपेठेत जून महिन्यात सुमारे 21 लाखाहून अधिक टन साखर विक्री केली जाणार आहे. ही साखर प्रतिक्विंटल 2900 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने विक्री करावी असा सरकारचा नियम तंतोतंत पाळला जात आहे. सध्या कारखान्यांकडून प्रतिक्विंटल 3200 ते 3500 रुपयाने साखर विक्री होत असल्याने कारखान्यांना वर्तमानात होणार तोटा टळण्यास मदत होत आहे.

साखर कारखान्यांनाकडू विक्री होणाऱ्या साखरेला किमान 3200 ते 3500 रुपये दर मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा होती. दरम्यान, केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करताना कारखान्यांनी किमान 2900 रुपयाने आपली साखर विक्री करावी, असा सूचना दिल्या होत्या. यातच साखरेचा बफर स्टॉक करण्यात आला. त्यामुळे कारखान्यांकडून विक्री होणाऱ्या साखरेच्या दरात वाढ झाली आहे. पॅकेज जाहीर करतानाच देशांतर्गत साखर कारखान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली आहे. सध्या या महिन्यात 21 लाख टनापेक्षा जास्त साखर विक्री केली जाणार आहे. या सर्व साखरेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे कारखान्यांकडून शिल्लक असणारी उसाची एफआरपी देण्यास मदत होणार आहे. प्रत्येक कारखान्यांनी साखर विक्री कोटा ठरवून दिला आहे. त्यामध्ये, देशातील 528 साखर कारखान्यांपैकी महाराष्ट्रातील 186 साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.

देशातील साखर कारखान्यांकडे सध्या ऊस बिलाची 22 हजार कोटींची आहे. ही थकबाकी देण्यासाठी प्रतिटन 55 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच जाहीर केला आहे. साखर उद्योगाला बळ मिळावे या हेतून पॅकेज जाहीर केले. आता यामध्ये अनेक बाबींमध्ये आक्षेप घेतले जात आहे. पण सध्या कोसळणारे दर मात्र कमी झाले आहेत. दरात स्थिरता राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here