कैथल साखर कारखान्याचा गाळप हंगाम 12 नोव्हेंबरपासून

131

कैथल, हरियाणा: उस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कैथल सहकारी साखर कारखान्यामध्ये नवा गाळप हंगाम 12 नोव्हेंबरपासून सुरु होईल. सहकार मंत्री डॉ. बनवारी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल. यासाठी कारखाना व्यवस्थापनाची तयारी सुरु आहे. कारखान्याकडून जवळपास 40 लाख उसाचे गाळप करुन साडे 4 लाख क्विंटल साखर तयार करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे.

याबरोबरच सरकारच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत कारखान्यामध्ये पहिल्यांदा गुळ साखरही बनवली जाईल. कारखान्याचे व्यवस्थापक निदेशक डॉ. पूजा चावरिया यांनी कारखाना अधिक़ार्‍यांच्या बैठकीबाबत त्यांना आवश्यक दिशा निर्देश दिले आहेत. जिल्ह्यामध्ये 17 हजार 300 एकरमध्ये उस शेती करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी कारखान्यामध्ये 44 लाख क्विंटल उस पोचवला जाईल. गेल्या वर्षातही कारखान्याने जवळपास 10.50 टक्के रिकवरी दराने साखर तयार केली होती. यावेळीही या रिकवरी रेटप्रमाणे साखर तयार करण्यासाठी इंजिनिअरर्स नी मशीन्स रिपेअरींग केली आहे.

कैथल साखर कारखान्याचे व्यवस्थापन निदेशक पूचा चावरिया म्हणाले, कैथल सहकारी साखर कारखान्यामध्ये नवा गाळप हंगाम 12 नोव्हेंबरपासून सुरु होईल. सहकारमंत्र्यांच्या हस्ते हंगामाचा शुभारंभ होईल

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here