कर्मयोगी परिचारक पांडुरंग साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ साठी आतापर्यंत १०,५०० हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी झाल्या आहेत.आणखी सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरच्या वाढीव नोंदी होतील, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन चेअरमन परिचारक यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.व्हा.चेअरमन कैलास खुळे यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.

चेअरमन परिचारक यांनी सांगितले की, कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार सुरू आहेत.हंगामात कारखान्यास सुमारे ४०० ते ४५० ट्रक, ट्रॅक्टर, ३०० ट्रॅक्टर बजेट व २०० ते २५० बैलगाडीची आवश्यकता आहे.त्यानुसार करार करण्यात येत आहेत.यावेळी संचालक दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभूते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सीताराम शिंदे, शामराव साळुंखे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here