कर्मयोगी, निरा-भीमा कारखाने पूर्वपदावर, अडचणी संपल्या : संचालक राजवर्धन पाटील

पुणे : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व निरा – भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या दोन्ही कारखान्यांच्या अडचणीचा काळ संपला आहे. कारखाने पूर्वपदावर येत आहेत. यंदाचा गळीत हंगाम २०२३-२४ मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत, अशी माहिती कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखाने शेतकरीहितासाठी कटिबद्ध आहेत असे ते म्हणाले.

राजवर्धन पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारही साखर उद्योग व शेतकरी हितासाठी सहकार्याची भूमिका घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकार चळवळ मजबूत होत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगापुढील प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून ते सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. आमच्या दोन्ही कारखान्यांकडून प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे सर्व बिले अदा करण्यात आली आहेत, असेही राजवर्धन पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here