कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ. मच्छिंद्र बर्डे

अहमदनगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ. मच्छिंद्र रंगनाथ बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी डॉ. बर्डे यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ. बर्डे म्हणाले की, अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करून आ. आशुतोष काळे यांनी कारखाना प्रगतीपथावर ठेवला असून हे नक्कीच अभिमानास्पद आहे. मतदारसंघाच्या विकासाबरोबरच कारखानादेखील त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. बर्डे यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.

यावेळी मावळते उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या सोबत काम केले व कारखान्याचे चेअरमन आ. काळे यांच्या सोबत देखील उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असतांना सहकारी साखर कारखानदारीच्या उत्तम नियोजनाचा आदर्श काळे यांच्या आ. कार्यपद्धतीत अनुभवयास मिळाला. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, प्र. कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर डॉ. प्रविण लोखंडे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here