उसाच्या नव्या वाणाचे नामकरण; लवकरच होणार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

कर्नाल : लखनौतील भारतीय ऊस संशोधन केंद्रात झालेल्या भारतीय समन्वय ऊस संशोधन योजनेच्या (AICRP) ३४ व्या बैठकीत उसाच्या नव्या प्रजातीला को-१६०३०, याला Karan-१६ या नावानेही ओळखले जाते. हे वाण कर्नालच्या ऊस संशोधन संस्थेने विकसित केले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीचे परीक्षण देशाच्या उत्तर-पश्चिम विभागात विविध नऊ ठिकाणी २०१९-२० पासून २०२१-२२ या कालावधीत करण्यात आले. त्याचे यशस्वी परिक्षण झाल्याने आता त्याचे नामकरण करण्यात आले. त्यांनी दावा केला की शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही प्रजाती उपलब्ध करून देण्यात येईल. ही प्रजाती लाल सड रोग व ऊसाच्या उच्च उत्पादनाचा संगम आहे. १२ महिन्यांत हा ऊस परिपक्व होतो. Co-१६०३० ही क्रॉस प्रजाती आहे. चांगल्या व्यावसायिक उत्पादनासह उसाची वाढही होते. टॉप बोरर, डंठल बोरर आदी किडींबाबत ही प्रजाती कमी संवेदनशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here