कर्नाटक: Core Green Sugar & Fuels चे क्षमता विस्तारासाठी प्रयत्न

कलबुर्गी : कोर ग्रीन शुगर अँड फ्युएल्स (Core Green Sugar & Fuels) ने कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील तुमकूर – यादगीरमध्ये आपली साखर उत्पादन क्षमता ५,००० tccpd पासून ८,००० tccpd पर्यंत वाढविण्याची योजना तयार केली आहे. या विस्तारीत क्षमतेमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ५० klpd पासून २०० klpd पर्यंत मोलॅसिसवर आधारित डिस्टिलरी युनिट आणि २४ मेगावॅटपासून ३२ मेगावॅट क्षमतेच्या सह वीज उत्पादन प्लांटचाही समावेश असेल.

याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनी डिसेंबर २०२३ पर्यंत या योजनेवर काम सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत कंपनी terms of reference (ToR) ची प्रतीक्षा करीत आहे. Core Green Sugar & Fuels पुढील दोन महिन्यांमध्ये योजनेसाठी ठेकेदार आणि मशीन पुरवठादारांची निवड करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here