मंड्या : मंड्यामधून म्हैसूरला रवाना होत असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शेतकरी संघटनांच्या सदस्यांना माय शुगर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. याशिवाय शेतकऱ्यांनी अवैध उत्खननावर पूर्ण प्रतिबंध लागू करावेत, मंड्या डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर युनियन लिमिटेडमध्ये (मनमुल) दुधाच्या भेसळीच्या प्रकरणांची निःष्पक्ष चौकशी करावी अशा मागण्याही निवेदनातून केल्या आहेत.
गजलगेरे गेटवर शेतकरी नेते सुनंदा जयराम यांनी बोम्मई यांना निवेदन सादर केले. यामध्ये माय शुगर फॅक्टरी तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी हा कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते, याची आठवण जयराम यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना करून दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. चालू वर्षी कारखाना सुरू करू असे आश्वासन जयराम यांना दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link