शेतक-यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्याने स्वतः बनवली अत्याधुनिक बाइक

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कर्नाटक मधील बंटवाल तालुक्यातील सजीपमुदा येथील रहिवासी श्री गणपती यांनी एक आगळीवेगळी गाडी तयार केली आहे जी १०० फुटापर्यंत मोठ्या आणि सरळ असणाऱ्या अरेका नारळाच्या झाडावर सहज चढू शकते, या गाडी मुळे भागातील शेतकऱ्यांच्या पारंपारिक पध्दतीला फाटा देत एक अत्याधुनिक मशीनद्वारे सदर झाडावर कीटक नाशके फवारणी तसेच पिक कापणी साठी उपयुक्त ठरत आहे.

48 वर्षाच्या गणपती यांनी, त्यांच्या भागात या कामासाठी माणसे उपलब्ध होत नसत आणि सदर काम हे अत्यंत जोखमीचे असलेमुळे फारच खर्चिक होते आणि त्यासाठी हे काम करणाऱ्या माणसांची कित्येक दिवस वाट बघावी लागत असे त्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा होत होता, हीच बाब लक्षात घेऊन गणपती याने यावर अत्याधुनिक मशीन बनविण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते मार्गी लावले.

गणपतींनी बनविलेली गाडी ही सुरक्षित असून त्यामुळे कामे एकदम पटापट होऊ लागली आहेत त्यामुळे साहजिकच उत्पादन पण वाढत आहे, पूर्वी या कामासाठी ८ मिनिटे वेळ लागत होता तर तो आत्ता फक्त १ मिनिटे लागतो,

या गाडीमध्ये २.१ बीएचपी मोटर, २ स्ट्रोक गियरबॉक्स, हायड्रॉलिक ड्रम डिस्क ब्रेक आणि चढण्यासाठी दोन चेनचा वापर केला आहे. ही गाडी ८० किलोग्राम पर्यंतच्या व्यक्तीसाठी असून १ लिटर पेट्रोल मध्ये १०० फुटा पर्यंतच्या झाडावर सुमारे १०० वेळा चढू शकते त्यामुळे दिवसाकाठी ४००० रुपये एवढी मोठी बचत होत आहे

माझ्या वडिलांनी तयार केलेल्या यंत्रामुळे झाडावर चढणे आणि उतरणे खूपच सोपे झाले आहे आणि हा अनुभव खूप भारी आहे, पूर्वी झाडावर कसे चढायचे हे मला माहित आहे पण आता या यंत्राच्या मदतीने मी अरेका नारळाच्या झाडावर आरामात चढू शकते आणि माझ्या वडिलांना शेतीमध्ये मदत करू शकते असे वक्तव्य गणपतीची मुलगी सुप्रिया हिने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here