कर्नाटक: एफआरपी वाढविण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

81

म्हैसूर : म्हैसूर येथे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या ऊसाला योग्य आणि लाभदायक दर (एफआरपी) देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सिंचन पंपावर मीटर लावण्याच्या योजनेचाही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्टेट शुगरकेन ग्रोव्हर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी जेएसएस कॉलेज ऊटी रोड सर्कलवर धरणे आंदोलन केले.

द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने गेल्या काही वर्षात एफआरपीमध्ये मोठी वाढ केलेली नाही. सध्या एफआरपी फक्त २८५० रुपये प्रती टन आहे. असोसिएशनचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करते. मात्र, डिझेलचे वाढलेले दर आणि खते, किटकनाशके यांच्यामध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे उत्पादन खर्चात खूप वाढ झाली आहे. सरकारने २०२१-२२ या वर्षासाठी एफआरपी वाढवून ३२०० रुपये प्रती टन करावी अशी मागणी त्यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here