कर्नाटक: सरकारने माय शुगर कारखाना चालविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची फेरी

58

मंड्या : कर्नाटक राज्य रयत संघाच्या सदस्यांनी मोटारसायकल फेरी काढली. राज्य सरकारने साखर कारखाना सुरू करण्याची मागणी करत उप आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.

कर्नाटक राज्य रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ज्युबली पार्कजवळ एकत्र येऊन बेंगळुरू-म्हैसूर राज्यमार्गावरून मोटारसायकल फेरी काढली. यावेळी राज्य तसेच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपायुक्त कार्यालयात पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी त्यांना अडविले. त्यावरुन आंदोलनकर्ते आणि पोलिस यांदरम्यान बरीच झटापट झाली.

राज्य सरकारने उसाचा प्रती टन ४००० रुपये दर देण्याचा, एफआरपी करण्याची मागणी करत केंद्र सरकारवर दबाव आणण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा म्हैसूर शहर आणि आसपासच्या जिल्ह्यात दसऱ्याच्या सणादरम्यान आंदोलने केली जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. कृष्णराज सागर (केआरएस) धरणाच्या परिसरातील वीस किलोमीटर अंतरामध्ये उत्खननास बंदी घालावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. सरकारने शेतकरी विरोधी धोरणे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यादरम्यान, माय शुगर ऊस उत्पादक संघाच्या सदस्यांनी राज्य सरकारने साखर कारखाना चालवावा या मागणीसाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here