कर्नाटक: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

बेळगाव: कर्नाटक राज्य रयत संघाच्या सदस्यांनी बेळगावमध्ये ऊस दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी उपायुक्त कार्यालयासमोरील धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.

शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयासमोर मुक्काम ठोकला आहे. रात्री सरकारविरोधी घोषणा देत त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. त्यांनी आपल्या दीर्घकालीन मागणीबाबत सरकारच्या निष्क्रीयतेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांनी उपायुक्त कार्यालयाचा समोरील दरवाजा बंद केला आहे. आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, कर्नाटक सरकारने ऊस दर प्रती टन ५५०० रुपये प्रती टन निश्चित करावा. साखर कारखाने शेतकऱ्यांना वाढीव ऊस दर देतील याची दक्षता घ्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here