बेळगाव : लैला शुगर्स कारखान्याचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू आहे. दररोज चार हजार टन गाळप होत आहे. वाहतूकदारांनाही दर दहा दिवसाला बिले अदा केली जात आहेत. आता कारखान्याने यावर्षीचा पहिला हप्ता तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे अशी माहिती ‘लैला शुगर्सचे अध्यक्ष व आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. मागील वर्षीची शिल्लक रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष हलगेकर म्हणाले की, गळीत हंगाम सुरू होण्यास एक महिना उशीर झाला आहे. आता उत्तम पद्धतीने गाळप सुरू आहे. कारखान्याकडून वाहतूकदार व शेतकऱ्यांचा विचार करण्यात येत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांचा ऊस, शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणामुळे आग लागून उसाचे नुकसान होते, त्यावेळी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावे. यावेळी सदानंद पाटील, तुकाराम हुंद्ररे, चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.