कर्नाटक सरकारने ऊस बंदी उठवावी: माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर, ता. 11: कर्नाटक सरकारने जाहीर केलेली ऊसबंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

श्री शेट्टी म्हणाले, अतिवृष्टी, महापूर आणि परतिच्या पावसाने ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. उसाचे उत्पादन घटनार आहे. या भीतीने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात ऊसबंदी केली आहे. सरकारचे हे धोरण शेतकऱयांवर अन्याय करणारे आहे. सरकारला शेतकऱयांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाही.

यंदा उसाचा सरासरी उतारा घटणार असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर असल्याने शेतकऱयांना एफआरपी पेक्षा जादा दर देणे कारखानादारांना शक्य आहे. तो किती मिळाला पाहिजे हे 23 नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here