कर्नाटक सरकार ग्रीन हायड्रोजन धोरण आणण्याच्या तयारीत

बेंगळूरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऊर्जा क्षेत्रासाठी २३,१५९ कोटी रुपयांची तरतूद केली, जी एकूण अर्थसंकल्पीय बजेटच्या ६ टक्के आहे. गेल्या वर्षी सिद्धरामय्या यांनी या क्षेत्रासाठी २२,७७३ कोटी रुपये किंवा एकूण बजेटच्या ७ टक्के निधी वाटप केले होते. त्याआधी, तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात १४,३८८ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक दीर्घकालीन उपक्रमांची घोषणा केली, ज्यात पुढील सात वर्षांत स्थापित वीज निर्मिती क्षमता ३२,०००MW वरून ६०,०००MW पर्यंत वाढवणे समाविष्ट आहे. ग्रीन हायड्रोजनसाठी केंद्र सरकारची योजना पुढे नेत, सिद्धरामय्या यांनी जाहीर केले की राज्य सरकार १० कोटी रुपये खर्चून प्रायोगिक तत्त्वावर समर्पित ग्रीन हायड्रोजन धोरण (green hydrogen policy) आणि स्वयं-शाश्वत ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here