बेंगळुरू: कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राज्याच्या मालकीची मंड्या साखर कारखाना (मायशुगर) खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेते शिवकुमार यांनी सरकारने ऊस उत्पादकांच्या हितासाठी साखर कारखाना चालवावा अशी मागणी केली आहे.
सरकार कोणताही सरकारी साखर कारखाना खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी विधानसभेत दिल्याची आठवण शिवकुमार यांनी करुन दिली आहे. काही दिवसांपूर्वी जनता दलाचे (एस) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी युडीयुराप्पा यांची भेट घेतली होती. कारखाना कोणत्याही खासगी कंपनीला चालविण्यास देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती.
कुमारस्वामी म्हणाले, म्हैसूरच्या महाराजांच्या आणि सर. एम. विश्वेश्वरय्या याच्या काळात उभारला गेलेल्या या कारखान्याशी राज्याच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे की हा कारखाना सरकारच्या नियंत्रणात राहिला पाहिजे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link