ऊस दरासह इतर प्रश्नांबाबत शेतकरी नेत्यांची परिषद होणार

बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि कृषी विषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांची गोलमेज परिषद १९ आणि २० मार्च रोजी होणार आहे. शेतकरी नेते कुरबुर शांतकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, या परिषदेत विविध राज्यांतील शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. कृषी उत्पादन, किटकनाशके, ठिबक सिंचन उपकरणे आदींवरील जीएसटी हटवला जावा अशी मागणी सर्व शेतकरी नेते करीत आहेत. पिक कर्ज देण्याच्या सध्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. नेत्यांनी ऊसासाठी वाढीव एफआरपीचीही मागणी केली असल्याचे शांतकुमार यांनी सांगितले.

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष शांतकुमार यांनी मागणी केली की, इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखान्याकडून मंजुरी देण्याची अट रद्द केली पाहिजे. शेतकऱ्यांना उत्पादनाच्या किमान समर्थन दराची हमी देणारा कायदा आणि सर्व पिकांसाठी पिक विमा योजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here