कर्नाटक : ऊस दरप्रश्नी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

72

म्हैसूर : कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघाच्या (Karnataka Sugarcane Cultivators Association) नेतृत्वाखाली म्हैसूर आणि आसपासच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबीत मागण्या सोडविण्याची मागणी करत निदर्शने केली. या समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी State Advisory Price (SAP) ची घोषणा करण्यास सरकार उशीर करीत असल्याबद्दल जोरदार टीका केली. आणि सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अनिश्चिततेला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी सांगितले की, काही खासगी साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या खरेदी दराच्या तुलनेत ३५० रुपये प्रती टन कमी दराने बिले दिली आहेत. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना एक निवेदन सादर केले आणि इशारा दिला की, जर एका आठवड्यात त्यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेणात आला नाही, तर ते आंदोलन गतिमान करतील. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर चक्का जाम करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here