कर्नाटक: ऊस शेतकर्‍यांनी हेमवती साखर कारखाना सुरु करण्यासाठी दिली 30 सप्टेंबरची डेडलाइन

कर्नाटक : चन्नारायणपटना तालुक्यातील श्रीनिवासपुर मध्ये हेमवती साखर कारखान्यासमोर काँग्रेस कार्यकर्ते आणि ऊस उत्पादकांनी सोमवारी धरणे आंदोंलन करुन कारखाना लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. जानेवारी 2016 पासून कारखाना बंद आहे. ज्यामुळे या परिसरातील हजारो ऊस शेतकर्‍यांना गाळपा दरम्यान अडचणींचा सामना करावा लागतो. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, 1984 मध्ये शेतकर्‍यांच्या हितार्थ सुरु करण्यात आलेला कारखाना आपला हेतु पूर्ण करण्यात अपयशी ठरला होता. कारखान्याच्या गाळप क्षमतेला चांगले बनवण्यासाठी व्यवस्थापक समितीने कारखान्याला एका खाजगी संस्थेच्या हाती सोपवले. खाजगी संस्था अटींना पूर्ण करण्यामध्ये अपयशी राहिली, या कंपनीने काही वर्षांपासून भाडे दिले नव्हते. ज्यामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला होता.

काँग्रेसचे एमएलसी एम.ए. गोपालस्वामी यांनी सांगितले की, कारखाना बंद झाल्याने शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत आहेत, कारण त्यांना आपला ऊस इतर कारखान्यांना पाठवावा लागत आहे. ज्यामुळे शेतकर्‍यांचा वाहतुक खर्च वाढला आहे, आणि ऊसाचे पैसे वेळेत दिले जात नाहीत. ते म्हणाले कि , आम्ही कारखाना 30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा सुरु करन्याची मागणी करत आहोत . जर कारखाना वेळेत सुरु झाला नाही, तर दुसर्‍या दिवशी चन्नारायणपटना पासून हसन मध्ये उपायुक्त यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढू.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here