कझाकिस्तान करणार १३४.४ हजार टन साखर आयात

अल्माटी : युरेशियन इकॉनॉमिक युनीयनकडून (ईएईयू) कझाकिस्तान १३४.४ हजार टन साखर आयात करणार असल्याची माहिती व्यापार आणि एकत्रिकरण मंत्रालयाचे राशिद ज़ुराबेकोव यांनी दिली.

जुराबेकोव म्हणाले, कझाकिस्तानकडून १३४.४ हजार टन पांढरी आणि कच्ची साखरेचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. या कोट्यापैकी कच्चा आणि तयार साखर वितरीत करण्याचा अधिकार कझाकिस्तानकडे सुरक्षित आहेत. हा कोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध आहे.

कझाकिस्तान आगामी पाच वर्षांमध्ये $11.6 यूएस बिलियन मूल्याच्या ३८० गुंतवणूक प्रोजेक्ट लाँच करणार आहे. तशी तयारी सुरू करण्यात आली आहे. कझाकिस्तानकडून साखर उद्योगाला प्रोत्साहन देणारी योजनाही राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ३८० गुंतवणूक योजनांमध्ये साखर उत्पादन वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here