कझाकिस्तान हटवणार साखर निर्यातीवरील प्रतिबंध

कझाकिस्तान : कृषी मंत्री सपरखान ओमारोव यांनी सांगितले की, कझाकिस्तान1 जून पासून साखर निर्यातीवरील प्रतिबंध आणि कोटा हटवणार. देशामध्ये खाद्य उत्पादनाची कसलीही कमी असू नये, यासाठी निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आला होता. कोरोना मुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाउन नियमांना आता शिथिल करण्यात आले आहे. ज्यामुळे व्यापार आता हळू हळू सामान्य होईल. 1 जूनपर्यंत साखरेच्या बरोबर इतर खाद्य उत्पादनांवर लावलेल्या सर्व प्रतिबंधांना हटवण्याची योजना बनवण्यात आली आहे. साखरेवर प्रतिबंध हटल्यानंतर जागतिक बाजारात कजाकिस्तान येथील साखरही येईल.

मंत्री ओमारोव यांनी साींगितले की, अधिक लाभदायक पीके, चारा आणि भाजीचे पीक, दुधी भोपळ्यासाठी वितरीत क्षेत्रांमध्ये वृद्धी केली जाईल. कझाकिस्तान साठी एक कृषी महत्वपूर्ण आर्थिक क्षेत्र राहीले आहे, जे आपल्या सकल घरगुती उत्पादनाच्या जवळपास पाच टक्के आहे आणि जवळपास 20 टक्के कष्टकर्‍यांना रोजगार देते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here