केनिया : साखरेच्या दरात घसरण शक्य

मोम्बासा : केनियातील ग्राहकांना आगामी काही दिवसांत साखरेच्या दरात घसरण दिसू शकते. कारण, करमुक्त साखरेची पहिली खेप मोम्बासा बंदरात पोहोचली आहे. यापूर्वी साखरेच्या आयातीवर साधारणपणे ५० टक्के शुल्क आकारले जात होते. थायलंडहून २१,००० टनाची पहिली खेप मंगळवारी अनलोडिंग होईल तर बुधवारी दुसरी खेप येईल अशी अपेक्षा आहे.

सरकारकडून गेल्या वर्षी साखर आयातीवर सूट देण्यात आल्यानंतर देशात येणारी करमुक्त साखरेची ही पहिलीच खेप आहे. सरकारने केनिया नॅशनल ट्रेडिंग कॉरपोरेशन (KNTC) ला आणखी २,००,००० टन साखर शुल्क मुक्त आयात करण्याची परवानगी दिली आहे. केनिया वर्ष अखेरीपर्यंत कोमेसा विभागीय ब्लॉकमधून किमान ३,००,००० टन साखर आयात करेल. केनिया आपली वार्षिक तूट भरून काढण्यासाठी आयात साखरेवर अवलंबून आहे. ही वार्षिक तुट ८,००,००० टन उत्पादनाच्या तुलनेत एक मिलियन झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here