केनिया : संपामुळे साखर कारखान्याचे मोठे नुकसान

नैरोबी : चेमेलिल साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गॅब्रियल न्यांगुसो यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय आंदोलनामुळे कारखान्याला Sh20 मिलियनचे नुकसान झाले आहे. कारखान्यात प्रती दिन १५०० टन साखर उत्पादन होते. त्याची किंमत Sh10 मिलियन डॉलर होते. विरोधामुळे काहीच गाळप झाले नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. साखर विक्रीच्या स्तरावरही मोठे नुकसान होत असल्याचे गॅब्रियल न्यांगुसो यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक आणि अर्थ विभागाच्या प्रमुखांना हटविण्याची मागणी करत कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने जवळपास २ किलोमीटपर्यंत उसाच्या ट्रकने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संपामुळे प्रशासन, वाहतूकदार आणि शेतकऱ्यांना जोरदार नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गाळप होईल म्हणून आपल्या उसाची तोडणी केली आहे. या शेतकऱ्यांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागेल. जर असाच विरोध सुरू राहीला तर ऊस शेतातच वाळण्याची भीती आहे. वाहतुकदारांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यांना वाहतूक केलेल्या उसाच्या वजनावर पैसे दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here